महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
आदर्श मार्कंडेय प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी....
सोलापूर : मजरेवाडी येथील आदर्श मार्कंडेय प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जुनिअर कॉलेजचे प्रा. विजयकुमार बम्मणगे हे होते. प्रथम प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा भंडारे सर जंगलगी सर ,प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा विजयकुमार बम्मणगे सर यांनी शिवचरित्राबद्दल विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशालेचे जेष्ठ सहशिक्षक अनिल मागाडे, शांतप्पा स्वामी, शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीशैल स्वामी, दत्ता गायकवाड विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले, व आभार प्रदर्शन संध्या मगर यांनी मांडले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment