महाराष्ट्र
उद्धवराव शाळेतील विद्यार्थ्यांना आनंद बाजार उपक्रमातून व्यवहाराचे धडे : विद्या भोसले
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी येथील उद्धवराज प्राथमिक मराठी शाळेत आनंद बाजार उपक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून प्रात्यक्षिकातून व्यवहारज्ञान घेण्याचा प्रयत्न 'आनंद बाजार' या उपक्रमातून करण्यात आला.
या उपक्रमाचा शुभारंभ निसर्ग माझा सखा मंचच्या संस्थापिका विद्या भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्धवराज प्राथमिक
शाळेचे मुख्याध्यापक वागेश शास्त्री, मार्कडेय प्रशालेचे प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड आणि प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन आवाज न्यूज चॅनेलचे उपसंपादक विजयकुमार लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पालेभाज्या,फळभाज्या,फळे यांची विक्री बरोबरच खाऊचे स्टॉल्स यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांच्या विक्रीमुळे वजनकाटा कसा वापरावा याचे प्रात्यक्षिक तसेच पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन ग्राहक व विक्रेता यांच्यातील व्यवहार ज्ञान या उपक्रमाद्वारे करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वागेश शास्त्री यांनी केले. सूत्रसंचालन मंगला बनसोडे यांनी केले तर संध्या भिंगारे यांनी आभार मानले. या उपक्रमाचे नियोजन अनिल मागाडे, काशिनाथ जंगलगी, संगमेश्वर मुंचडी,हिरेमठ, प्रमोद कुलकर्णी, शिवशंकर अचलरे, शांताप्पा स्वामी, अभिजीत भंडारे,बम्मणगे यांनी केले होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment