भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर, दि.१९- भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला सेटलमेंट सोलापूर. या प्रशालेत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
  प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर राज्यगीताचे सामुदायिक गायन झाले. याप्रसंगी विष्णू गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मध्ययुगात सर्व जाती, धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष, समताधिष्ठित लोकशाहीप्रधान स्वराज्याची निर्मिती केली, असे प्रतिपादन केले.
    यावेळी साहेबराव शिंदे, किरण गायकवाड, दाऊत आतार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन महादेव यादव यांनी केले तर लक्ष्मण पुजारी यांनी आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads