महाराष्ट्र
मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर शाळेत शिक्षक पालक सभा संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिरात पालक शिक्षक सभा एस. आर. पी. बटालियनचे अधिकारी प्रकाश शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक श्रीधर टेळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा 'उपक्रम राबवण्याबाबत शासनाच्या व जि. प. सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशान्वये देशाभिमानाच्या 'जनजागृती' व 'घरोघरी तिरंगा' फडकवण्याकरिता 'एक सभा तिरंग्यासाठी' म्हणून पालक शिक्षक विद्यार्थी सहविचार सभेला मुख्याध्यापक श्रीधर टेळे सर यांनी अवगत केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व विकासासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री योजनेबाबत ही मार्गदर्शन केले. शिवणकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, लोकसेवा शाळा ही नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजी घेणारे मुख्याध्यापक असल्याचे सांगितले.
यावेळी पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी सर, शालेय विकास समितीचे अध्यक्ष नंदकुमार टेळे सर, काशिनाथ जेऊरकर, ग्रा .पं. सदस्य शाकीर पटेल , प्रतिष्ठित पालक वर्ग, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य श्री बसप्पा घाटे सर यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष सुतार सर यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment