ऑल आउट ऑपरेशन दरम्यान अवैद्य हातभट्टी दारू वाहतुक ; मंद्रुप पोलिसांची कारवाई - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

ऑल आउट ऑपरेशन दरम्यान अवैद्य हातभट्टी दारू वाहतुक ; मंद्रुप पोलिसांची कारवाई


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर(मंद्रूप):  दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी मंद्रुप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार काषीद, पोलीस काॅस्टेबल  सागर चव्हाण, पोलीस काॅस्टेबल दिनेष पवार, पोलीस काॅस्टेबल संदीप काळे असे ऑल आउट, कोंबींग ऑपरेशन दरम्यान पाहीजे फरारी आरोपी चेक करून पोलीस ठाणेस हजर असताना बातमी मिळाली की, एक इसम तेलगांव ते कंदलगांव जाणारे रोडने मोटार सायकल वरती बेकायदेेशीररीत्या हातभट्टी दारुची वाहतुक करणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना सांगुन त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. 
       पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कंदलगांव ते तेलगांव जाणारे रोडवर गावडेवाडी फाटयाजवळील कॅनलजवळ दबा धरून थांबले असता थोडयावेळाने बातमीप्रमाणे एक इसम मोटार सायकल वरती तेलगांव रोडने कंदलगांव दिशेने भरधाव वेगात येत असताना दिसला त्यास थांबण्याचा इशारा करून गराडा घालूुन जागीच पकडले. त्याचे नाव सुरेश धेनू राठोड वय  47 वर्षे, रा. भोजप्पा तांडा, सोलापुर असे सांगितले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचे पाठीमागे सिटवर दोन काळे रंगाचे मोटार टयुबमध्ये एकुण 60 लिटर हातभट्टी दारू आंबट, उग्र, घाण वासाची प्रती लिटर 50 रुपये प्रमाणे एकुण 3000/- रु. व हातभट्टी दारू वाहतुक करणेस वापरलेली त्याचे ताब्यातील एक होन्डा सी.बी. शाईन सिल्वर रंगाची मोटार सायकल तीचा आरटीओ नंबर MH - 13 - CX - 8652 अंदाजे किंमत 50,000/- रू. रुपये असा सर्व मिळुन रुपये 53,000  चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचेवर मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads