वडापूर येथील ग्रामदैवत श्री प्रभूलिंग यात्रा : भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी भाविकांच्या साक्षीने रंगला पालखी भेट सोहळा - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

वडापूर येथील ग्रामदैवत श्री प्रभूलिंग यात्रा : भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी भाविकांच्या साक्षीने रंगला पालखी भेट सोहळा


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावातील श्री प्रभुलिंग यात्रा विविध कार्यक्रमाने मोठया उत्साहात संपन्न झाली.
     दि. १९ फेब्रुवारी रोजी श्री प्रभुलिंग पालखी वडापूर व मिरी यांची नंदीध्वज, श्री महादेव काठी, श्री नरसिंह काठी , श्री विजयानगरी काठी, श्री मलुआई काठी व मानाच्या 'काठ्यां सह सवाद्य मिरवणूक गावातून मंदिराकडे काढण्यात आली.   
    वडापूरचे ग्रामदैवत श्री प्रभूलिंग यात्रेस १९ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. दुपारी ३ वाजल्यानंतर एकेक पालखी आपापल्या वाहनातून पालखी तळावर दाखल होत होत्या. ४ वाजता श्री ओग्यांमुत्त्या( हत्तुर), श्री अवधूत वडिया (भंडारकवठे), श्री मुत्त्यापवडिया (सुसलाद), श्री पिंडवडिया (बोराळे), श्री ओगसिद्ध (सिद्धापूर), श्री मळगालसिद्ध (मंद्रूप), श्री कंटीसिध्द (जिगजेनी), श्री मुत्त्याप्पा (मद्रे), श्री अमोघसिद्ध (विंचूर), श्री मलकारसिद्ध (सोरेगाव), श्री भुताळसिद्ध (सिद्धापूर), श्री प्रभुलिंग (कणबस), श्री प्रभुलिंग (मिरी) ,श्री प्रभुलिंग वडापूर या सर्व ११ पालख्यांचा "अमृतमयी भेटीचा" सोहळा संपन्न झाला. 
११ पालख्यांचा भेट सोहळा झाल्यानंतर सर्व पालख्यांची एकत्रित गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्री प्रभूलिंग मंदिरात सर्व पालख्या विसावल्या.व रात्री ओगसिध्द गायन संघ कुंभारहळ्ळी व बिरुलिंगेश्वर गायन संघ तोरणी यांचा ढोलावरची गाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   
      दि.२० फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांचे नैवेद्य, व रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत शोभेचे दारुकाम व तसेच रात्री घुंगराच्या साठी संसाराची माती या मराठी नाटकाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय पटांगणात करण्यात आले होते.
     दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ते सायंकाळी ६ पर्यत लेकींचे नैवेद्य कार्यक्रम व दुपारी कर तोडणे कार्यक्रम संपन्न झाला. व सायंकाळी भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. व रात्री सारेगमप ऑर्केस्ट्राचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय मैदानामध्ये करण्यात आले  होते.
   यात्रा कमिटीकडुन १९,२०,२१ या तिन्ही दिवशी दुपार पासून ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा कमिटीच्या नियोजनाबद्दल आलेल्या सर्वच भाविकांनी कौतुक केले. व यात्रा कमिटीने मंद्रूप पोलीस स्टेशनचे व पंचक्रोशीतील नागरिकांचे व गावकऱ्यांचे आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads