डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


सोलापूर, दि.24 : अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ.झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत असून 2022-23 चे प्रस्ताव पात्र संस्थांकडून मागविण्यात येत आहेत.

            या योजनेसाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र संस्थांनी सन 2022-23 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांच्याकडे 30 ऑगस्ट 2022 पूर्वी सादर करावेत. 30 ऑगस्ट 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.


Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads