महाराष्ट्र
सामाजिक न्याय दिनानिमित्त रविवारी समता रॅलीचे आयोजन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर,दि.24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत दरवर्षी 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी रविवारी (दि.26 जून) सकाळी 8.30 वाजता समता रॅलीचे आयोजन केल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली.
रॅलीची सुरूवात सकाळी 8.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पार्क) चौक येथून डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गे सात रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता येथे समारोप होईल.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment