महाराष्ट्र
शालार्थ आयडीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने अनिता मानसिंग राठोड यांचे आजपासून दोन लहान मुलींसह आमरण उपोषण..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : अनिता मानसिंग राठोड उपशिक्षिका महासिध्द प्राथमिक शाळा, भंडारकवठे, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर येथे कार्यरत असून त्यांना मान्यता जा.क. मिळालेली आहे. परंतु कोणतेही वेतन व भत्ते चालू नाहीत कारण शालार्थ आयडी नंबर नाही. शालार्थ आयडी मिळावा म्हणून प्रस्तावावर मुख्याध्यापक यांनी सही करून पाठवावा म्हणून पत्रान्वये कळविले आहे. सदरच्या प्रस्तावावर मुख्याध्यापकांना आदेश असतानाही सही करून शालार्थ आयडी या प्रस्तावावर वेतन अधिक्षक (प्राथमिक) सोलापूर यांचेकडे पाठवत नाहीत. त्यामुळे वेतनापासून वंचित आहे. सदरचा प्रस्ताव मुख्याध्यापक सहीविना वेतन अधिक्षक (प्राथमिक) यांचेकडे सादर केलेला आहे. गेली दोन महिन्यांपासून शालार्थ आयडीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सदरचा शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचेकडे पाठवावा अन्यथा मंगळवार दिनांक १७/०५/२०२२ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषणास दोन लहान मुलींसह बसणार असल्याचे अनिता राठोड यांनी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार सदरचा शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव त शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचेकडे पाठविला होता त्याचा अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न दिल्या मुळे आमरण उपोषणास बसल्याचे असल्याचे अनिता राठोड यांनी पत्रकारा शी बोलताना सागितले.
या उपोषणास अनिता राठोड, श्रेया पवार (वय 5 ), श्रावणी पवार (वय4), नारायण पवार,सुधीर कांबळे (जिल्हा अध्यक्ष प्रोटान संघटना),अमन कोळी (पुणे विभागीय सचिव), राजेंद्र कांबळे (महासचिव प्रोटान संघटना),अकबर नदाफ, संजय राठोड, मिलींद खंदारे, प्रशांत जाधव, मोरे सर, नानासाहेब कांबळे, राजेंद्र आवळे, अफजल शेख, सुनील पवार, सुनंदा बनसोडे, शबाना शेख आदी उपोषणास बसलेले आहेत
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment