सामाजिक
कै.डाॅ.वैजिनाथ विश्वनाथ दरेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चादरीचे वाटप
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि दर्शनाळ गावात शेतकरी,गरिब,गरजूंना केवळ १० रुपयात वैद्यकीय सेवा देणारे डॉ.वैजनाथ विश्वनाथ दरेकर यांचे 29 जानेवारी 2019 रोजी अपघाती निधन झाले.त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सासरे आप्पाराव विश्वनाथ विभूते यांनी प्रार्थना फाउंडेशन मधील अनाथ मुलांना चादरीचे वाटप केले.तसेच त्या मुलांना गोड खाऊचे वाटप देखील केले.
यावेळी त्यांच्यासोबत बसवराज गुरुपदप्पा हुडगी,उमरगा तालुक्यातील सौ.अश्विनी सचिन दंडगे,शिवांश सचिन दंडगे,चि.वेदांत वैजिनाथ दरेकर,कुमारी त्रिशा वैजिनाथ दरेकर आदी उपस्थित होते.या निमित्ताने आप्पाराव विश्वनाथ विभूते आणि बसवराज गुरुपादप्पा हुडगी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment