महाराष्ट्र
इंगळगीत महिला पतसंस्थेचे दिलीप माने यांच्या हस्ते उद्घाटन..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात मातोश्री कै. शांताबाई हत्तुरे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित इंगळगी तसेच ऑल इज वेल या फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीच्या गोवा व महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आला.
सहकारातून सशक्तिकरण हे ब्रीदवाक्य घेऊन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण सोलापूर तालुका कार्यक्षेत्र असलेले पतसंस्था स्थापन करण्याचा उद्देश असल्याचे मुख्य प्रवर्तक शिवानंद हत्तुरे यांनी सांगितले तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू येथे ऑल इज वेल फॅसिलिटी मॅनेजमेंट हे सर्विस प्रोव्हायडर कंपनी गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असून आता त्याचे कार्यक्षेत्र वाढून महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी सेवा देण्यासाठी इंगळगी येथे महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या कार्यालयाची स्थापना करत असल्याचे त्यांनी सांगितले
कार्यक्रमास जय हिंद शुगरचे बब्रुवान माने देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अमोल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळासाहेब बंडगर, नगरसेवक बाबा मिस्त्री, एम के फाऊंडेशनचे महादेव कोगनूरे, किरण प्रमोद नंदुरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मौलाली शेख पतसंस्थेचे चेअरमन अश्विनी हत्तुरे, संचालक मंडळ, सरपंच लक्ष्मी वळसंगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत उपासे सर व दिलीप धुळवे यांनी केले तर आभार राजशेखर बंडगर यांनी मानले...
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment