भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न...

 


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी                     सोलापूर दि.18  :-  भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सोलापूर ग्रामीण भागतील 07 शासकीय शाळांची निवड करण्यात आली आहे. समाजातील विविध स्तरातील बालकांना समाजाच्या उज्वल भवितव्याची दिशा निश्चित करण्यासाठी व सुजाण नागरिक बनविण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

            या कार्यक्रमांतर्गत निवड केलेल्या प्रत्येक शाळेस 50 हजार रूपये निधी देण्यात आला आहे. हा कार्यक्रम अक्कलकोट येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा येथे पार पडला. यावेळी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तसेच 8 वी व 9वी च्या विद्यार्थ्यांना पोलीसांचे कर्तव्य व कामकाज, सहनशिलता, संघभावना, वाहतूकीचे नियम, वडीधाऱ्यांचा आदर इत्यादी विषयांवर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी , मनोजकुमार यादव व पोलीस विभागातील मोरे , बिराजदार , कोकणे, म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका करजगीकर मॅडम यांनी केले.     या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads