महाराष्ट्र
औज मंद्रूप गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी ताहेरताज पाटील यांची तिसर्यांदा निवड..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर(मंदूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी ताहेरताज महंमदताज पाटील यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल औज मंद्रूप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी सत्कार सोहळा संपन्न झाला.सलग 2 वर्षे गावचे पोलीस पाटील म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळल्यामुळे त्यांची तिसर्यांदा निवड करण्यात आली.
यावेळी गावच्या सरपंचा रकमा चंद्रकांत बने,उपसरपंच अरविंद उंबरजे,पोलीस पाटील नागनाथ उंबरजे,ग्रामपंचायत सदस्य जैनुद्दीन मकानदार,अश्फाक जहागीरदार,कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक जाहेद पाटील,मल्लिकार्जुन तरडे,सचिन गायकवाड,काशिनाथ तरडे,सिध्दाराम वाघमारे आणि ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment