आईच्या एकसष्टी निमित्त मुलाकडून अन्नतृप्ती योजनेस ११,१२१ रुपयांची मदत... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

आईच्या एकसष्टी निमित्त मुलाकडून अन्नतृप्ती योजनेस ११,१२१ रुपयांची मदत...



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर : एम.के.फाउंडेशनचे संचालक श्री.गुरुराज रुद्रमठ यांचे मातोश्री श्रीम.महानंदा रुद्रमठ यांच्या एकसष्टी निमित्त एम.के.फाउंडेशनच्या अन्नतृप्ती योजनेस ११,१२१ रुपयांची मदत केली.

        सोलापूर शहरातील गरीब, गरजू वृद्ध निराधार उपाशी राहू नयेत म्हणून एम.फाउंडेशनच्या वतीने सामाजिक जाणिवेतून अन्नतृप्ती योजनेच्या माध्यमातून दोन वेळच्या जेवणाची डब्बा पोहचवली जाते.

          फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपल्या आईंच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता हा दिवस सत्कर्मी लावावा या यासाठी श्री.गुरूराज रुद्रमठ यांनी सामाजिक दायित्व म्हणून अन्नतृप्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध निराधारांच्या भुकेची आस मिटवण्यासाठी एक अनमोल असे कार्य आईंच्या वाढदिनी केले आहेत.

         माझ्या जन्मदिनी मुलाच्या या सामाजिक कार्याने माझ्या मुलावर मला अभिमान वाटतं असल्याचे प्रतिपादन श्रीम.महानंदा रुद्रमठ यांनी व्यक्त केले.

        प्राथमिक स्वरूपात अन्नतृप्ती योजनेच्या डब्यांचे पूजन मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामीजी,नंदगांव मठाचे राजशेखर महाराज, नागठाण मठाचे श्री गुरू, हत्ती कणबसचे महास्वामीजीं आणि अक्कलकोट मठाचे महास्वामीजीं यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
         
         यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेवजी कोगनुरे ,हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोल कारंडे आदींसह रुद्रमठ परिवारांचे सदस्य उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads