उद्या सोरेगाव मध्ये जिल्हास्तरीय केसीसी शिबीर.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

उद्या सोरेगाव मध्ये जिल्हास्तरीय केसीसी शिबीर..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर, दि.११: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केसीसी शिबीर शुक्रवार, दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी आरसेटी ,एस. आर. पी. एफ. गट क्रमांक २, च्या समोर, विजापूर रोड, सोरेगाव ,सोलापूर येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आयोजित केले आहे. शिबिराचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.     
      
दुभती जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसाय संगोपनासाठी दैनंदिन खर्च जसे की चारा, दवाखाना, विमा ,पाणीपुरवठा, विज बिल, व  मजुरी इत्यादीसाठी खेळत्या भांडवलाची गरज शेतकऱ्यांना आवश्यक आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी वित्त विभाग ( DFS), भारत सरकार यांनी सर्व जिल्ह्यात केसीसी शिबीर आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत .                    

शिबीरास येताना अर्जदारांनी दोन फोटो, आधार कार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक व पत्त्याचा पुरावा घेऊन येणे आवश्यक आहे. शिबिरात अर्जदारांच्या अर्जाची छाननी करून अर्ज योग्य त्या बँकेच्या शाखेकडे पाठवण्यात येईल. पात्र असलेल्या अर्जदारास दिलेली बँकेची शाखा पंधरा दिवसात कर्ज मंजुरी देईल.

शिबीरास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग,  उपनिबंधक दुग्ध विकास विभाग व मत्स्य संवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असेही श्रीमती पवार यांनी सांगितले
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads