महाराष्ट्र
वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांचा वर्षपुर्तीबद्दल सत्कार..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर दि.२ नोव्हेंबर : वळसंग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांचा वळसंग पोलीस ठाणे येथील पदभार घेऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रा.डाॅ.राजदत्त रासोलगीकर आणि लोकप्रधान न्यूज चॅनेलचे दक्षिण तालुका प्रतिनिधी नारायण घंटे यांच्या वतीने शाल,फेटा,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेले आहे.पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सध्या सुरु असलेल्या आँपरेशन परिवर्तन अंतर्गत वळसंग हद्दीतील अनेक हातभट्टी दारु विक्रेत्यांचे मनःपरिवर्तन करुन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून सन्मानजनक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन अवैध व्यवसायिकांना त्यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले.
एक वर्षाचा कार्यकाल अत्यंत समाधानकारक आणि वैशिष्ट्यपूर्ण रितीने पूर्ण झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंबंधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment