मंद्रुप तहसील कार्यालयासमोर आखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मंद्रुप तहसील कार्यालयासमोर आखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन..


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर (मंदूप) २ नोव्हेंबर : आखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष मेळावा २४ ऑक्टोबरपासून दक्षिण सोलापूर येथील कंदलगाव ,भंडारकवठे, औज,मंद्रुप, हत्तरसंग कुडल ,औराद, हत्तुर याठिकाणी सभेमार्फत शेतकऱ्यांना संदेश दिला. त्याच पार्श्वभूमीवर मंद्रुप येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरवात करण्यात आले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पुढील प्रमाणे,
१) चालू वर्षी ऊसास प्रतीटन ३५०० दर मिळावा.
२) एफ.आर.पी चे तीन तुकडे करुन ६०:२०:२० प्रमाणे ऊस बील देणारा कायदा रद्द करावा.
३)ऊसाची एकरकमी एफ.आर.पी १४ दिवासांच्या आत द्यावी.
४)तोडणी व वाहतुकीसाठी टोळी व वाहन धारकाकडून होणारी लूट बंद व्हावी.
५) रेनेव्हू शेअरींग कारखान्याकडून उपपदार्थ निर्मिती मधुन मिळणारा नफा शेअर धारक शेतकऱ्यास ७० :३० टक्के शेतकऱ्यांना द्यावे.
या आंदोलनास जिल्हा अध्यक्ष सिध्दपा कलशेट्टी, कॉ.सुलेमान शेख , कॉ. श्रीमंत डोमनाळे शहर अध्यक्ष जावेद आवटे ,पैगंबर नदाफ गजानन साठे , सुनील साठे , सिकंदर मकानदार , मुंजप्पा कोल्हे ,सुभाष कोरे, विठ्ठल अवताडे , जनहित शेतकरी संघटना ता.अध्यक्ष धर्मराज पुजारी , अण्णाराव वाघमारे, विश्वनाथ बल्लेश्वर व दक्षिण सोलापूर येथील विविध भागातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
----------------------------------------------------
जिल्ह्यातील कारखानदार मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना एफ.आर.पी देण्याकरिता टाळाटाळ करित आहेत. वेळेवर रक्कम न दिल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यंदाच्या वर्षी एकरकमी एफ.आर.पी.अधिक तीनशे रुपये एकरकमी मिळावी :-                    डॉ. शिवानंद झळके
अ. भा. किसान सभा ता.अध्यक्ष द. सोलापूर
--------------------------------------------------
ऐफ.आर.पी एकरकमी मिळावी यासाठी आंदोलन करावे लागावे ही खरी शेतकऱ्यांची वेदना आहे. कोरोनासारख्या माहामारीत वाचलेल्या शेतकऱ्यांचे छळ करण्याचे संघटीत साखर सम्राट करतात. आणि त्यांच्यापुढे प्रशासन मान झुकवते व सम्राटापुढे निष्प्रभ होतात. हा छळण्याचा नवीन प्रकार शासन आणि साखर सम्राटांची मानसिकताच दाखवते.याला आंदोलन करावे लागणे शेतकऱ्यांचा कष्टाचे अपमान आहे :-  ईक्बाल मुजावर
              जिल्हा प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना
-----------------------------------------------------
आखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत धरणे आंदोलनाला आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा जाहीर पाठिंबा ,,,,
शेतकऱ्यांची एफ.आर.पी एकरकमी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.:-
                     अनमोल केवटे
जिल्हा अध्यक्ष - अ.भा.भ्रष्टाचार निर्मूलन समिती सोलापूर

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads