सामाजिक
श्याम अधटराव सरांचा सेवापुर्ती सोहळा आदिवासी विकास प्रतिष्ठान सोलापूर यांच्या कार्यालयात संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दि.31ऑक्टोंबर रोजी आदिवासी विकास
प्रतिष्ठान कार्यालय सोलापूर येथे शाम अधटराव मुख्याध्यापक याचा सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमात शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना अरुण भाऊ लोणारी आधिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे नेते यांनी ५० वर्षापासून समाज अन्याय सहन करत आहे कर्मचाऱ्यांच्या नोकरी धोक्यात आल्या आहेत मुलाचे उच्च शिक्षण जात प्रमाणपत्रा अभावी थांबले आहेत "वैधता मिळत नाही या कारणास्तव नविन नोकरी उपलब्ध होत नाही त्यामुळे हाल अपेष्टा सहन करत आहे याचा फायदा घेवून अडलेल्या समाजाचा गळा चिरू नका असा समज समाजाप्रती शासनाला दिला. याप्रसोगी अरुणभाऊ लोणारी यांच्या हस्ते श्याम अधटराव यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सदाशिव कोळी राज्य सरचिटणीस स्वराज्य संस्था यांचाही सत्कार करण्यात आला. शाम अधटराव यांच्या सेवापूर्वी कार्यक्रमात प्रकाश राजे ASI यानीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास समाजाचे अभ्यासक लक्ष्मण कोळी, आदिवासी विकास उपाध्यक एम. टी.कोळी , सचिव अशोक कोळी, संचालक धोंडीराम कांबळे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार सुधाकर मिरजकर वडापूर गावचे औदुंबर कोळी, नावा फांऊडेशनचे अध्यक्ष राजकुमार कोळी व इतर शिक्षक कर्मचारी सोमनाथ कोळी, चिदानंद कोळी, संतोष कोळी, व अनेक समाज बांधव उपस्थित होते. या सर्वानी शाम अधटराव सरांना आपले उर्वरीत आयुष्य समाजाच्या कामासाठी खर्ची घालवे असे सांगून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी कोळी महासंघ कर्मचारी संघटना अध्यक्ष व उमलते नेतृत्व सागर लोणारी, अजय माने, गोपाळ कोळी उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आदिवासी विकास अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केला व आभार मानले कार्यक्रमाचे सांगता समारंभ सन्मुख गुतरंगी व संतोष कोळी यांनी केल्या.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment