मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या विंचूर येथील अल्पवयीन मूलाचा पाण्यात बुडून मृत्यु - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या विंचूर येथील अल्पवयीन मूलाचा पाण्यात बुडून मृत्यु




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी 
  सोलापूर (मंदूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील अल्पवयीन मुलगा प्रकाश बेलाप्पा साबळे( वय वर्ष १५ ) हा  आपल्या मित्रांसोबत शनिवार,दिनांक ९ ऑक्टोबर रोजी दुपारी पोहण्यासाठी गेला होता.सदरच्या बातमीत पाहत असलेल्या विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधकर्त्यांना सापडला.
      मंद्रूप पोलीसांच्या मदतीने सदर तरुणाचा मृतदेह मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
      यावेळी मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ढवळे,सलबते,पोलीस शिपाई चव्हाण,स्वामी तसेच विंचूरचे पोलीस पाटील झाडबुके व ग्रामस्थ उपस्थित होते.अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads