शेतकऱ्यांच्या एकरकमी एफ आर पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा व ऊस परिषद आयोजन - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

शेतकऱ्यांच्या एकरकमी एफ आर पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा व ऊस परिषद आयोजन




सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
पंढरपूर:-शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 8 ऑक्टोंबर रोजी मा खा राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत भव्य असा शेतकरी मेळावा व ऊस परिषद पंढरपूर येथे आयोजीत करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर ता.अध्यक्ष सचिन शिंदे-पाटील यांनी दिली.
  केंद्र व राज्य शासनाने एक रकमी एफ आर पी चा कायदा रद्द करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती अगदी गंभीर बनली आहे यासाठी जागर एफ आर पी चा आराधना शक्तीपिठाची एक रकमी एफ आर पी आमच्या हक्काची अशा प्रकारे शेतकऱ्यांचे कष्टाचे दाम मिळवण्यासाठी पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी दुपारी ०१:वा शेतकरी मेळावा व ऊस परिषद आयोजित करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads