मंद्रुपचे नूतन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पत्रकारांचा सत्कार - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मंद्रुपचे नूतन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पत्रकारांचा सत्कार



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 मंद्रूप: दक्षिण सोलापूर तालुक्यातील दक्षिण सोलापुर
तालुका पत्रकार संघटना व मराठी पत्रकार संघटनेच्या नूतन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची मंद्रूपचे नूतन तहसिलदार राजशेखर लिंबारे व नायब तहसिलदार जितेंद्र मोरे आणि तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी वतीने सत्कार करण्यात आले. यावेळी तहसिलदार राजशेखर लिंबारे म्हणाले. तालुक्यातील सर्व जनते पासून शेतकरी गोरगरीब लोकांच्या कामासाठी तहसील कार्यालय चोवीस तास चालू राहिल.नागरिकांनी सर्व कागदपत्रे रितसर कायद्या प्रमाणे असल्यास लवकर काम होईल. पत्रकार बंधूनी चांगल्या कामासाठी सहकार्य करावे. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच मंद्रूप अपर तहसील कार्यालयाची निर्मिती झाली आहे, हे कार्यालय जनतेसाठी व्यासपीठ ठरेल,जनतेची कायदेशीर कामे तत्काळ मार्गी लागतील, नियमबाह्य कामे केली जाणार  नाहीत,शासनाच्या विविध योजना  आपण प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रात  मंद्रूप तहसीलदार कार्यालय अव्वल  क्रमांकावर आणू अशी ग्वाही
मंद्रूपचे नूतन अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली.
यावेळी सर्व पत्रकाराना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुंदले,उपाध्यक्ष मधुकर राठोड खजिनदार- समीर शेख, कार्याध्यक्ष राजकुमार वारे, सचिव आमसिध्द व्हनकोरे, सहसचिव अल्ताफ शेख, अमोगसिद्ध मुंजे अमोगसिद्ध लांडगे, नितीन वारे,शाम जोशी,  गौतम गायकवाड, मल्लू कांबळे , महासिद्ध साळवे, बबलू शेख, महमद शेख, नंदकुमार घंटे  व मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी,आनंद बिराजदार, संजय इंगळे, बिसलसिध्द काळे, तलाठी निंगप्पा कोळी भाजपा तालुका संघटक अध्यक्ष गौरीशंकर मेंडगुदले,डॉ शिवानंद झळके,धानय्या स्वामी आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads