सामाजिक
एम.के.फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन अनाथ मुलांच्या सानिध्यात साजरा.. सिव्हिल हॉस्पिटल येथे अन्नदान तर प्रार्थना फाउंडेशनच्या अनाथ मुलांना खाऊ वाटप
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर दि.२५ ऑक्टोबर : सोलापूर जिल्ह्यात अल्पावधीत आपल्या सामाजिक कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या एम.के.फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान आणि प्रार्थना फाउंडेशन येथे अनाथ मुलांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागातील येणाऱ्या नातेवाईकांना जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले. अनाथ मुलांना प्रेरणा मिळावी या उद्देशानी त्यांच्या बरोबर वेळ घालवून खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे, सोलापूर महानगर पालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक बाबा मिस्त्री, एम.के.फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख अमोल कारंडे, सागर सिमेंटचे अधिकृत विक्रेते आनंद लोणावत, प्रसाद मोहिते,नागेंद्र कोगनुरे,मल्लिकार्जुन दारफळे, मल्लेशी मंदोली,काशीम शेख,किरण राठोड, गणेश कुंभार, शिवाजी राठोड,संतोष उकरंडे,उमेश मैंदर्गी, महांतेश बगले,अजित पाटील, अमित गिराम,विशाल धोत्रे,किशोर कोळगे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment