सोलापूर येथील सौ. विजयालक्ष्मी व श्री.संजय म्हमाणे या दांपत्याकडुन गरीब, गरजू निराधारांना वाटण्यासाठी एम.के. फाऊंडेशन ला सोलापुरी चादरी भेट.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सोलापूर येथील सौ. विजयालक्ष्मी व श्री.संजय म्हमाणे या दांपत्याकडुन गरीब, गरजू निराधारांना वाटण्यासाठी एम.के. फाऊंडेशन ला सोलापुरी चादरी भेट..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : सोलापूर येथील सौ. विजयालक्ष्मी व श्री.संजय म्हमाणे या दांपत्याने एम.के.फाउंडेशनच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन गरीब, गरजू निराधारांना वाटण्यासाठी एम.के. फाऊंडेशन ला सोलापुरी चादरी भेट म्हणून दिल्या.

यावेळी बोलताना एम. के. फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे म्हणाले की,सामाजिक जीवनात अश्या लोकांच्या सहकार्याच्या जोरावरचं आम्ही सामाजसेवा करत आहोत, म्हमाणे कुटुंबाचे विशेष आभार ! आपल्याकडून मिळालेली मदत नक्कीच येणाऱ्या थंडीच्या काळात निराधारांना मायेची ऊब देईल.

गेल्यावर्षी आम्ही फाउंडेशन कडून निराधारांना थंडीत त्रास होऊ नये म्हणून ब्लँकेट वाटपाचा उपक्रम रबिवला होता, या वर्षी सुद्धा पुन्हा हा उपक्रम हाती घेण्याचा संकल्प असून त्यास सेवाभावी वृत्तीने म्हमाणे कुटुंबासारख्या अश्या असंख्य कुटुंबाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads