महाराष्ट्र
स्वाती राहुल चिंता यांच्या वाढदिवसानिमित्त एम.के.फाउंडेशनच्या अन्नतृप्ती योजनेस मदत..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : सोलापुर महानगरपालिकेचे नगरसेव अंबादास चिंता यांचे सून स्वाती राहुल चिंता यांच्या वाढदिवसानिमित्त एम.के.फाउंडेशनच्या वतीने गरीब, वृद्धावस्थेत असणाऱ्या निराधारानासाठी राबविल्या जाणाऱ्या अन्नतृप्ती योजनेस एका दिवसाच्या जेवणाची सोय करून अर्चना कुडक्याल यांनी आपल्या वहिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वाती चिंता यांच्या वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत निराधारानांच्या जेवणाची सोय केल्याबद्दल मानसिक समाधान मिळाल्याची भावना सौ.अर्चना कुडक्याल यांनी व्यक्त केले.
एम.के.फाउंडेशनच्या संचालिका दिव्या राठोड यांच्या वतीने अर्चना कुडक्याल यांचे फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक महादेव कोगनुरे , कु.अर्चना कुडक्याल, दिव्या राठोड,शिवाजी राठोड, अजित पाटील, संतोष उकरंडे, मल्लिकार्जुन दारफळे, मल्लू बगले आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment