सुनील सोनटक्के यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सुनील सोनटक्के यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार



समीर शेख सोलापूर जिल्ह्य प्रतीनिधी
सोलापूर,दि.18: सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुनील सोनटक्के यांनी आज घेतला. श्री. सोनटक्के यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचाही पदभार आहे.

यावेळी माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

श्री. सोनटक्के यांनी यापूर्वी जळगाव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, लातूर उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे. मागील विधानसभेच्या निवडणूक कालावधीत श्री. सोनटक्के यांनी दिड महिना सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads