सामाजिक
यत्नाळ येथे एम.के.फाउंडेशनच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : एम.के.फाउंडेशनच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ सोलापूरचे खासदार मा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजीं यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंद्रूपचे प.पु.रेणुक शिवाचार्य महास्वामीजीं, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील, शांती नगरचे प.पु.शिवपुत्र महास्वामीजीं, बालयोगी श्री.यल्लालिंग महाराज होटगी, बालयोही श्री.शिवशरण महाराज यत्नाळ, एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.महादेवजी कोगनुरे,एम.के.फाउंडेशन जिल्हाप्रमुख मा.अमोल (बापू) कारंडे, तालुका प्रमुख मा.नरसप्पा दिंडोरे, आप्पाशा मंदोली, प्रभाकर दिंडोरे, सातलिंग अंबलगी, श्रीशैल कोरे, सिद्धाराम बळगानुरे, गेनसिद्ध बंडगर, सुनील हिरापुरे, रमेश तोरणगी, राजशेखर सगरे, कल्लाप्पा हंगरगी, शिवगोंडप्पा मुडवे, भैरण्णा भैरामडी, मल्लिकार्जुन कोणदे, मल्लेशी मंदोली आदी उपस्थित होते.
अल्पावधीत समाजकार्याच्या माध्यमातून फाउंडेशनने जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आपत्कालीन परिस्थितीत फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात दिला जातो. फाउंडेशनचा समाजसेवेचा हेतू बघून युवकांच्या आग्रहाखातर फाउंडेशनचा कार्य लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक गावात ते शाखा स्थापन करणार आहेत.
शाखा स्थापन करण्याचा हेतू एवढाच आहे की, तळागाळातल्या माणसांची सेवा करण्यासाठी नवनवीन माणसं त्याचाशी जोडावीत.
यावेळी गरजू विध्यार्थ्यांना फाउंडेशन कडून सायकल आणि वह्या वाटप करण्यात आल्या.
उदघाटन कार्यक्रमासाठी असंख्य गावकरी उपस्थित होते. विशेषतः महिला वर्ग आवर्जून उपस्थित होते. मोठ्या उत्साहात, जल्लोषात यत्नाळकरांनी त्याचे स्वागत केले.
यावेळी मल्लिकार्जुन धारसंगे,काशीम शेख, किरण राठोड, नागेंद्र कोगनुरे,गुरुलिंग अचलेरे, कल्लप्पा आहेरवाडी, हंचनाळ, सुरेश कोणदे, रेवणसिद्ध कोणदे, धानलिंग दिंडोरे, सिद्धाराम हिरापुरे, गेनसिद्ध शेंगडे, लक्ष्मण माने, राम वाघमोडे, शिवकुमार कोरे, आप्पा हिरापुरे, सोमय्या स्वामी, गणेश तळळीकर, राजकुणार हिरापुरे, सिद्धाराम कोळीगार, शाखा प्रमुख हणमंत दिंडुरे, उपप्रमुख यशवंत डोंगरे, सचिव नागेश उमराणी, कार्याध्यक्ष भारत तोरणगी, शरणबसप्पा चिंचोळी, अनविरप्पा हिरापुरे, बापूराव हिरापुरे, सागर जिवाजी, सिद्धाराम टेंगळे, सोमनाथ अंबलगी, कुपेंद्र हिरापुरे, अण्णाप्पा हिरापुरे, धानलिंग हिरापुरे आदीसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment