प्रशांत मठ याच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान .. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

प्रशांत मठ याच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान ..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनधी
   सोलापूर : श्री.मल्लिकार्जुन माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री. मल्लय्या मठ सर यांचे चिरंजीव कु. प्रशांत मठ याच्या वाढदिवसानिमित्त एम.के.फाउंडेशनच्या अन्नतृप्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या निराधानांसाठी एक दिवसाच्या जेवणाची सोय करण्यात आली.

        हार, तुरे असे इतर खर्च करण्यापेक्षा गरजूंची सेवा करावी या हेतूने केगांव बु येथील मठ कुटुंबाच्या वतीने वाढदिवसादिवशी गरजूंना मदत करण्यात आली .आजकालच्या तरुण पिढीसाठी   सामाजिक बांधिलकेची भावना निर्माण व्हावी,यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याची भावना श्री.मल्लय्या मठ यांनी व्यक्त केले. 

         कु. प्रशांत मठ यांच्या वाढदिवसानिमित्त एम.के.फाउंडेशनचे संचालक श्री. नागेंद्र कोगनुरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जुन दारफळे, महांतेश देसाई,सिध्दारुढ देसाई, विद्यानंद सणके,सोमनाथ अतनुरे, संतोष उकरंडे, मल्लिकार्जुन बगले आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads