महाराष्ट्र
मंगळवेढा तालुका रहिवासी संघ पुणे यांच्या वतीने रावेत (पुणे) येथे आ. समाधान आवताडे यांचे अभिनंदन पर सत्कार संपन्न...
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपल्या उल्लेखनीय विजयाने तमाम जनतेच्या मतरुपी आशिर्वादास पात्र ठरलेले पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मा.आ.समाधान (दादा) आवताडे यांचा मंगळवेढा तालुका रहिवाशी संघ - पुणे यांच्यावतीने रावेत (पुणे) येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
यावेळी आ.समाधान (दादा) आवताडे यांनी सत्कार उत्तरादखल बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहेरघरात संतभूमी आणि देवभूमी विचारांचा वारसा व शिकवण लाभलेल्या मंगळवेढा मातीतील लोकांकडून होणारा माझा हा सन्मान म्हणजे फक्त सत्कार नसून मतदारसंघातील माय - बाप जनतेच्या उद्धारासाठी पुढील सत्कार्य करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन आहे. मातीशी असलेली अतुट नाळ आपणांस अशा विधायक कार्यक्रमातून आणखीनच घट्ट करते व जनसेवेच्या मार्गावर चालत असताना मला आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद नेहमीच ताकद देतील असेही आमदार महोदयांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मा. संजय (बाळा) भेगडे, भोसरी विधानसभा मा.आ.महेश (दादा) लांडगे, चिंचवड विधानसभा मा.आ.लक्ष्मण(भाऊ) जगताप, माजी आमदार मा. जगदीश मुळीक, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.सौ. उमाताई खापरे, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष मा. नवनाथ ढवळे, उद्योजक मा. दिपक भोंडवे, उद्योजक मा. म्हातुशेठ वाकडकर, उद्योजक मा. सुरेश येलपले, उद्योजक मा. प्रसाद बोराडे, भाजपा चिटणीस मा. अमित बोरके, उद्योजक देवा पवार, उद्योजक मा. जगदीश नाडे, मा.जेष्ठ नेते मा. प्रा. येताळा भगत (सर), दामाजी शुगर संचालक मा. राजेंद्र (बापू) सुरवसे, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन संचालक मा. सरोजभाई काझी, युवा नेते मा. विराज (दादा) आवताडे व आदी मान्यवर, संयोजन समिती सदस्य आणि पुणेस्थित मंगळवेढा येथील नागरीक उपस्थित होते.
शेवटी मंगळवेढा तालुका रहिवाशी संघ - पुणे संस्थापक अध्यक्ष मा. आझादभाई पटेल (दारुवाले) यांनी सर्वांचे आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment