कामती खुर्द येथील स्व.दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीचै औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

कामती खुर्द येथील स्व.दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीचै औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न...



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
मोहोळ (कामती) : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे  2 ऑव्टोंबर 2021 रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती व स्व.दाजीकाका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंत 1 ते 3 नंबर आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम स्वरुपात बक्षीस वितरण समारंभ तसेच स्व.दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जिल्हात गणित तज्ञ्न म्हणुन ओळख निर्माण केलेले श्री नंदकुमार मुळे सर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम अश्याप्रकारे त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले स्व.दाजी काका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांचे अध्यक्ष सुभाष आण्णा पाटील हे होते.सर्व प्रथम मंच्यावरील मान्यवर मंडळी च्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर 1ली ते 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
त्याच बरोबर जिल्हात गणित तज्ञ्न म्हणुन ओळख निर्माण केलेले श्री नंदकुमार मुळे सर यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले मंच्यावरील सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
यावेळेस कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्व.दाजीकाका गोडबोले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सुभाष आण्णा पाटील शाळेचे मुख्याध्यापक गेंगाणे सर व संस्थेचे शिक्षक व संचालक पाटीलDS. बारगजे सर.प्रचंडे सर व नंदुकुमार मुळे यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मंच्यावरील वरील मान्यवरांसह.शाळेचे मुख्याध्यापक गेंगाणे एस.एस ,पाटील डी.एस,प्रचंडे सी.एस,
ओहाळ पी.यु,माने एस.एस,कोळी.बी.एम,आठवले एम.ए,
पाटील एस.टी,गायकवाड सर,भागडे सर,म्हमाने मॅडम,जावळे मॅडम,कोरे मॅडम ,चौधरी मॅडम,भोईटे मॅडम,
व शिक्षेकत्तर कर्मचारी कांबळे एस.आर,गावडे आर एस,
पाटील व्ही.एस,वानकर डी.बी.यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालक व गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओहाळ सर यांनी केले. व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.गेंगाणे सर यांनी केले.व कार्यक्रमास अनुमोदन. म्हमाने मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार पाटील बी.एस यांनी मांडले.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads