शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयांनी त्रैमासिक विवरणपत्र 31ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावे - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयांनी त्रैमासिक विवरणपत्र 31ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावे




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर, दि.01 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय,व खाजगी कार्यालयांनी सप्टेंबर 2021 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई, आर - 1 ऑनलाईन 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करणेची सक्ती करणारा) कायदा 1959 व त्याखालील नियमावली 1960 मधील कलम 5(1) (शासकीय आस्थापनांसाठी), 5(2) (खाजगी आस्थापनांसाठी) नुसार, सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरूष/स्त्री/एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ई आर - 1) स्थानिक सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग हा योजनाबध्द आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी होत असतो. अशा प्रकारची प्राप्त होणारी सांख्यिकी माहिती महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे दर तिमाहीस पाठविली जाते.

त्रैमासिक विवरणपत्र ( ई आर - 1) https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. या वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई आर - 1 हे प्रत्येक तिमाही संपल्यानंतर ऑनलाईन सादर करणेसाठी आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड यांचा वापर करावा. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे. त्याचा वापर करून भरावा. 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर (0217 - 2950956) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री जाधव यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads