महाराष्ट्र
मंगळवेढ्यातील महान संत दामाजीपंतांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण लोकवर्गणीतून किंवा स्वखर्चातून करण्यास परवानगी द्या :- सिद्धेश्वर आवताडे
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:- महान संत श्री दामाजी पंतांच्या पुतळ्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले आहे. वरील कापडी छत फाटलेल्या अवस्थेत आहे या सर्व कारणाने सुशोभीकरणाचे काम आठ दिवसात प्रशासनाने पूर्ण करावे अन्यथा लोकवर्गणीतून व माझ्या स्वखर्चातून सुशोभीकरणासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे आशयाचे निवेदन मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले.
यावेळी संभाजी घुले, पोपट पडवळे,
नितीन मोरे सर, संजय जगताप, माऊली कोंडुभैरी, अशोक माळी आदी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment