महाराष्ट्र
विशाल नगर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : प्रभाग क्रमांक 24 मधील विशाल नगर येथे उपमहापौर तथा नगरसेवक राजेश काळे प्रभाग क्रमांक 24 यांच्या भांडवली निधीमधून 32 लाख रुपये कामाचे उद्घाटन आज दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी मेहता शाळेचे प्रमुख राजेश पटवर्धन , इंडियन मॉडेल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर A.D.जोशी सर, डब्ल्यू आय टी चे प्राचार्य हल्कुंडे साहेब, वीरशैव नगर चे चेअरमन डॉक्टर एस एस पाटील, डॉक्टर जी के देशमुख सर, जय जलाराम नगर चे चेअरमन बडगिरे साहेब, भोसले साहेब, मंत्री चांडक पार्क चे चेअरमन दिपक पवार, सेक्रेटरी श्रीधर देशपांडे तसेच श्रीकांत नगरच्या उषा सोना मॅडम, भाजपा मंडल अध्यक्ष महेश देवकर, मसुती साहेब, आनंद बिराजदार, भाजपा महिला चिटणीस संपदा जोशी, अनुराधा खारे, एडवोकेट नीलेश जोशी सर, विभागीय अभियंता उंबरे रावसाहेब, अशोक अण्णा गुळगी, शाळेच्या मुख्याध्यापिका बागेवाडी मॅडम, कुगावकर मॅडम, तसेच जलिमिंची मॅडम, विशाल नगरच्या होस्पती मॅडम, कळसे मॅडम, रमेश जाधव, विशाल राठोड, प्रमोद राजे ठाकरे, सचिन झाकणे, सहित विशाल नगरचे बहुसंख्य नागरिक या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागेवाडी मॅडम यांनी केले. प्रास्ताविक मेहता शाळेचे अध्यक्ष राजेश जी पटवर्धन यांनी केले. आभार विशाल नगरचे सामाजिक कार्यकर्ते अंकुर येळेकर यांनी मानले.
या कामांमुळे जुळे सोलापूर भागामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून गेल्या 31 वर्षांमध्ये हद्दवाढ भागातील कामे झाली नव्हती. हे या पाच वर्षात मार्गी लागली असे इंडियन मॉडेल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष A.D. जोशी यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल नगर येथील सर्व रहिवासी व मेहता शाळेतील सर्व कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment