महाराष्ट्र
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 29 रोजी पंढरपूर येथे विद्यार्थ्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन:- सचिन शिंदे- पाटील
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा.
पंढरपूर:-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने दि29/09 बुधवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजी चौकातून भव्य असा विराट आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांची सैन्यभरती, स्पर्धा परीक्षा अशा विविध मागण्यासाठी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.
कोरोना व लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांची सैनिक भरती, विविध स्पर्धा परीक्षा बंद आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एजबार झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे विचार शासनाने करून त्यांना वयोमर्यादा वाढवून मिळावे तसेच तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य विभाग भरती नियमीत दरवर्षी घेणे तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करावी.
सर्व पदांची भरती करताना अर्ज ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घ्यावे सर्व शासकीय परीक्षा फी शंभर रुपये करावी व विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दाखले तहसील कार्यालयात तातडीने मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिन-शिंदे पाटील यांनी दिली.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच विजय रणदिवे,शहाजान शेख,अजित बोरकर, अमर इंगळे, सचिन आटकळे, बाहुबली सावळे, नाना चव्हाण,मनोज गांवधरे ,सोमनाथ घोगरे ,नवनाथ मोहिते, सचिन ताटे आदी परिश्रम घेत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment