सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २८ गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेस आजपासुन सुरवात... - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २८ गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेस आजपासुन सुरवात...



चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद.
जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम

समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (कामती)२७ सप्टेंबर : मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या प्रयत्नातून , जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज कामती पोलीस स्टेशन हद्दीतील 28 गावांमधील सर्व पोलिसपाटील, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सर्व पत्रकार व  सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून  नागरिकाची उपस्थिती राहिली.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. 
                     सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य  श्री, जालिंदर लांडे  उपस्थित होते.   कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर, श्री. सुर्यकांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात   मा. सहा.पोलीस निरीक्षक श्री. अंकुश माने  यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस स्टेशन चे सर्व बीट अंमलदार यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले.

गेल्या 9 वर्षांत पुणे,नाशिक,सातारा,व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे  व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

*ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट*

*घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
*गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरी स्थांना एकाच वेळी कळणे.
*अफवांना आळा घालणे.
*प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
*पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

*ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये*

*संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
*गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
*संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600
*यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
*संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
*दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
*नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात.
*नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
*एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
*वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
*घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.
*संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
*चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
*गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
*सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads