महसूल व पोलीस प्रशासन एकत्रित काम करून वाळू चोरांना जेरबंद करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करा:- मनोज लोहिया - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

महसूल व पोलीस प्रशासन एकत्रित काम करून वाळू चोरांना जेरबंद करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करा:- मनोज लोहिया



सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा.
मंगळवेढा:- तालुक्यातील वाळू तस्करांच्या उर्मुटपणाने एका निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांला आपला जीव गमवावे लागले ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे व बेकायदेशीर वाळू  चोरांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट दिली.
   यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज लोहिया म्हणाले की,  महसूल व पोलीस प्रशासन एकत्रित काम करून वाळू तस्करांच्या  मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन  प्लान तयार करण्याविषयी सूचना दिल्या. पोलिस कारवाईच्या भीतीपोटी शिरसी येथील हॅटसन डेअरी जवळ पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोलनकर यांच्या अंगावर वाळूचा टेम्पो घालून पोलीस पाटला समोरच ठार मारले होते. या घटनास्थळाला भेट देऊन जप्त करण्यात आलेल्या टेम्पोचे निरीक्षण यावेळी मनोज लोहिया यांनी केले.
  मयत गणेश सोलनकर यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्वावर तात्काळ शासकीय नोकरीत सहभागी करून घेवू तसेच त्यांच्या
 कुटुंबाला आर्थिक मदत व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतील अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्याचे कौतुक केले.
  यावेळी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील वाळू उपशाला पाठबळ देणाऱ्याची गय केली जाणार नाही.
   यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप व मंगळवेढा ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads