मंद्रूप येथील सेवालाल नगर तांड्यात राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत १सष्टेंबर ते ३० सष्टेंबर २०२१ दरम्याने दशसुत्री कार्यक्रमाचे आयोजन..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : द. सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील सेवालाल नगर तांड्यात राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत १सष्टेंबर ते ३० सष्टेंबर २०२१ दरम्याने दशसुत्री कार्यक्रमाचे आयोजन सेवालाल नगर तांडा मंद्रूप येथील अंगणवाडी क्रमांक ३ मध्ये काल हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या जल्लोषातपार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती RKफाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड आणि श्रीमंत पवार हे मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या दशसुत्री कार्यक्रमां अंतर्गत गरोदर मातांचे ग्रहभेट करणे.
श्रेत्रिय भेटी घेणे ,स्तनदा मातांनी संवाद साधणे ,गरोदर मातांची ओटीभरणी कार्यक्रम घेणे,तरंग सुपोषंणाची माहिती सांगणे सॅम मॅम मुलांचा शोध घेणे हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास RKफाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड, यांच्यासह श्रीमंत पवार,अंगणवाडी सेविका बेबी दामु राठोड,अंगणवाडी मदतनीस श्रीदेवी ख्याडे,सुज्ञानी शिंगाडे आशावर्कर यांच्यासह सेवालाल नगर तांड्यातील महिला मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment