वळसंग येथे लोकहिताचे कामांसाठी आंदोलन करणार्‍या प्रहार संघटनेच्या १० कार्यकर्ते विरुध्दोत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

वळसंग येथे लोकहिताचे कामांसाठी आंदोलन करणार्‍या प्रहार संघटनेच्या १० कार्यकर्ते विरुध्दोत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर :  प्रहार संघटनेचे दक्षिण तालुका अध्यक्ष मोहसीन वजीर तांबोळी हे २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० ते १२:५० वाजण्याच्या दरम्यान टोलनाकादक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील टोलनाका येथे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन केल्याने मोहसीन तांबोळी व त्यांचे कार्यकर्ते यांना सरकारी वाहनात बसवुन वळसंग पोलिस ठाणे येथे आणण्यात आले.त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे  मोहसिन वजीर तांबोळी ( वय वर्षे 27) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर , बापू बापूराव वाघमारे ( वय वर्षे 31) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर  ,अशपाक सैपान माशाळकर ( वय वर्षे 27) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर ,  राजू इसाक तांबोळी ( वय वर्षे 35) राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर ,मौलाना मंसूर शेख ( वय वर्षे 28 राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर, सलीम वजीर तांबोळी (वय वर्षे 26) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर , हारूण दाऊद फुलारी ( वय वर्षे 45) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर , करीम बाबू फुलारी ( वय वर्षे 50) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर , महेश शंकर व्हनकडे ( वय वर्षे 23) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर , सरदार शब्बीर शेख ( वय वर्षे 22) राहणार वळसंग तालुका दक्षिण सोलापूर हे दिनांक 22/09/2021 रोजी दुपारी  12:30वा ते 13:00 वाचे सुमारास वळसंग टोलनाका येथे स्थानिक नागरिकांना टोल फी  माफ करा व स्थानिकांना नोकरी वर घ्या या मागणीसाठी बेकायदेशीर जमाव जमवुन आंदोलन करून सोलापूर ते अक्कलकोट जाणारे रोडवरील वाहने अडवून सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लोकांना एकत्र जमण्यासाठी व मोर्चे ,आंदोलने ,रास्ता रोको आदि कार्यक्रम न करणे बद्दल सीआरपीसी 144 प्रमाणे बंदी आदेश जारी केले असताना व त्यांना आंदोलन न करणे बद्दल कायदेशीर पणाने सीआरपीसी 149 ची नोटीस देखील दिली असताना देखील त्यांनी एकत्र जमवून वाहने अडवून बेकायदेशीर आंदोलन करून शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.
         म्हणून या दहा जणांविरुद्ध दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भारतीय दंड विधान संहिता कलम 269, 270, 188, 341, 143 व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51ब तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3)चा भंग कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अधिक तपास सहायक पोलीस फौजदार जमादार हे करीत आहेत.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads