आधार-मोबाईल लिंकींगसाठी विशेष शिबीर - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

आधार-मोबाईल लिंकींगसाठी विशेष शिबीर


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी   सोलापूरदि.23: जिल्ह्यातील शासनाच्या विविध डीबीटी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळणेसाठी आधार अद्ययावतीकरणआधारसोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सोलापूर विभाग व पंढरपूर विभाग यांच्या अधिनस्त सर्व पोस्ट ऑफिसमध्ये 23 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत तीन दिवसीय आधार-मोबाईल लिंकींग विशेष शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा आधारच्या नोडल अधिकारी शमा पवार यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

            विविध शासकीय योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यांना थेट लाभ मिळण्यासाठी डीबीटी ही प्रणाली राबविली जाते. प्रणालीमध्ये शासनामार्फत लाभ हा थेट लाभार्थी यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये मिळणे अपेक्षित आहे. परंतु काही योजनेच्या लाभार्थ्यांचे आधारवरील नाव चुकीचे असणेमोबाईल नंबर लिंक नसणे किंवा बँक खाते आधारशी जोडलेले नसणेयामुळे त्यांना डीबीटीमार्फत लाभ मिळण्यास विलंब होत आहे.

            पीएम किसान योजनाशिष्यवृत्तीएमआरईजीएस या डीबीटी योजनेतील लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती पवार यांनी केले आहे.

            सोलापूर विभागअंतर्गत पोस्ट ऑफिस- सोलापूर मुख्यालयबार्शीअक्कलकोटमोहोळदाजी पेठसोलापूर सिटीसोलापूर मार्केटइंदिरानगरमंगळवार पेठएमआयडीसीमेडिकल कॉलेजनवी पेठजीएनपीओअशोक चौकसिध्देश्वर पेठशिवशाहीमंद्रुपनान्नजवैराग आणि पंढरपूर विभाग अंतर्गत पंढरपूर मुख्यालयअकलूजसांगोलामाढाकुर्डुवाडीकरमाळामंगळवेढानातेपुतेमाळशिरसवेळापूरश्रीपूरटेंभूर्णीमोडनिंबकरकंबजेऊरपिलीवमहूदनवी पेठआधार लॅपटॉप किट याठिकाणी आधार लिंकिंग करून मिळणार आहे.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads