महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
सिद्धापूर येथे स्वयंम शिक्षण प्रयोगामार्फत स्वाभिमान प्रकल्प व्यवसाय- उदयोजता विकास कार्यशाळा संपन्न.....
सोलापूर (मंगळवेढा): सिद्धापूर येथे स्वयंम शिक्षण प्रयोगामार्फत स्वाभिमान प्रकल्प व्यवसाय- उदयोजता विकास कार्यशाळा सिंद्धापूर येथील पहिली ५० महिलाची बॅच ३१ जानेवारी पासून चालू झाली. या कार्यशाळेत दहा दिवसाचे व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवसी मनजागृती स्वताचा प्रवास, दुसऱ्या दिवसी ध्येय निश्चय सेंटिंग, तिसऱ्या दिवसी बाजार भेट संधी मापिंग प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना शेती + व्यवसाय मजुरी + व्यवसाय अश्या वेगवेळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी बॅच मधील महिलांनी गावात गणपती मंदिर येथे बाजार भरवलेला होता बाजारात खाण्याचे पदार्थ, भाजीपाला, कपड्याचे स्टॉल, किराण स्टॉल, स्टेशनरी असे विविध व्यवसायाचे स्टॉल लावण्यात आले होते.
हा बाजार पाहण्यासाठी SBI बॅक सिद्धापूरचे बॅक मॅनेजर, जि.प.प्रा. शाळा सिद्धापूरचे शिक्षक व विद्यार्थी व ग्रामस्थ आले होते. शाळकरी मुलानी शोभा वाढवली तसेच बॅच मधील 50 महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या CRP पदाधिकरी, ग्रामसंघाच्या पदाधिकारी , लिपीका उपस्थित होते.
गावातील महिलाचे बाजार व स्टॉल प्रशिक्षण कसे चालू आहे हे बघण्यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोग लातुरचे माळवदकर,डिवीलाईट कंपनी मुंबई चे फरा मॅडम,हिना मॅडम व स्वयमं शिक्षण प्रयोग सोलापूरचे अनुराधा मॅडम, व टेनर लक्ष्मी करपे ,सखी शशिकला ढावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या बाजाराची शोभा वाढविण्यासाठी महिला मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
यावेळी SSP स्वयंम शिक्षण प्रयोग लातूर चे माळवदकर, स्वयंम शिक्षण प्रयोग सोलापूरचे अनुराधा मॅडम, डिवो लाईट कंपनी मुंबई चे हिना मॅडम, फराह मॅडम यांनी भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाग्याथी सोनार यानी केले.स्वागत सुरेखा मोरे, सुरेखा सुतार यांनी केले तर आभार शशिकला ढावरे यांनी मानले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
Post a Comment