महाराष्ट्र
मंद्रूप येथे दक्षिण सोलापूर क्रांती महिला प्रभाग संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दक्षिण सोलापूर क्रांती महिला प्रभाग संघाच्या वतिने मंद्रूप येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व पदाधिका-यांची साधारण सभा घेण्यात आली. यावेळी क्रांती महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष दिपाली घडेराव व सचिव अंजुम पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आली. या शिबिरात प्रभागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
यावेळी संचालक माधावबागचे शलाका पाटील मॅडम यानी हृदयविकार , दैनंदिन जीवनात महिलांनी आरोग्य विषयक घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. व खाद्यपदार्थाचे स्टॉलही लावण्यात आले होते. स्टॉल वरती पापड, मक्याचे तांदळाचे कुरडई, ज्वारीचे भाकरी, शेंगा चटणी, दुधापासून बनलेले पदार्थ, पेढा, विभूती, गोमूत्र पासून बनवलेले विविध पदार्थही ठेवण्यात आले होते
यावेळी तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास सभापती सोनाली कडते, चंद्रकला कणकी , पंचशीला कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या गटातील महिला सदस्याचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी मंद्रूप प्रभागातील सर्व सीआरपी ताई, अर्चना घाले, श्रीदेवी रेवतगावकर, नकुशा म्हेत्रे, सुनंदा कोळी, अश्विनी गावडे, सुरेखा व्यवहारे, वर्षा भडकुंबे, सीमा उडानशिव, कल्पना सोनकवडे, लक्ष्मी करपे, शीला घाले, अश्विनी बिराजदार, इर्षा दातार , यशोदा तिवारी,वसुधा वांगीकर ,बँक सखी पुजारी, कुंभार ताई स्नेहल कमते, सुवर्णा भडकुंबे तसेच महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियान तालुका दक्षिण सोलापूरचे सर्व कर्मचारी व अधिकारी ,सर्व प्रभागातील ग्राम संघातील पदाधिकारी व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रभाग समन्वयक अतुल श्रीसागर सर यानी केले व सूत्रसंचालन स्वप्नाली लोभे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरस्वती लोभे यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment