महाराष्ट्र
मंद्रूप पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा नावा फाऊंडेशन कडून सत्कार..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचा वडापूर सरपंच औदुंबर कोळी व नावा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पोलिस अधिकारी डॉ. नितीन थेटे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी रविंद्र मांजरे यांनी पदभार घेतला. पदभार घेतल्यानंतर वडापूर सरपंच औदुंबर कोळी व नावा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कोळी यांच्या कडुन फेटा,शाल व पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नावा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कोळी, वडापूरचे सरपंच औदुंबर कोळी, बहुजन आवाज न्यूज चॅनल चे पत्रकार समीर शेख व नावा फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment