केंद्र शासनाकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ...
या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाकडून दि. 15 डिसेंबर 2021 अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली असून महाविद्यालयांनी अर्जाची ऑनलाईन पडताळणी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 अशी आहे. तसेच महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डवरील माहिती अद्यावत केलेली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना दि. 29 नोव्हेंबर 21 पासून नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची सुविधा एन एस पी पोर्टलवर देण्यात आलेली आहे.
या शिष्यवृत्तीचे एन एस पी पोर्टलवरील विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करुन अर्जावर विनाविलंब कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे डॉ. अशोक उबाळे, विभागीय सहसंचालक (उ. शि.) सोलापूर विभाग यांनी कळविले आहे.

Leave Comments
Post a Comment