कोरवली येथील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व जि.प.सदस्या सौ.शैला गोडसे यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम यांची घेतली सदिच्छा भेट - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

कोरवली येथील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व जि.प.सदस्या सौ.शैला गोडसे यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम यांची घेतली सदिच्छा भेट




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
  सोलापूर (कामती) : कोरवली येथील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व जि.प.सदस्या सौ.शैला गोडसे यांनी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम यांची घेतली भेट .व  प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबद्दल चर्चा केली.व ठोस आश्वासन मिळविले.    
 कोरवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २००८ साली बांधले व ती इमारत २ वर्षातच वापरण्यास धोकादायक बनली.२०१६ साली तत्कालीन सरपंचांनी हा प्रश्न जि.प.मध्ये धसास लावण्याचा प्रयत्न केला.आत्ता या प्रकरणी जि.प.अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे  व जि.प.सदस्या सौ.शैला गोडसे यांनी व्यक्तिशः लक्ष घातले आहे.ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यायची व जि.प. सोलापूर यांनी भरघोस निधी उपलब्ध करून द्यायचा असे चर्चेअंती ठरले. चंचल पाटील यांनी लेखी स्वरूपात आश्वासन शैला गोडसे मॅडम व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना दिले. येत्या २, ३ महिण्यात प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल.या प्रकरणी प्रामाणिक प्रयत्न करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नव्याने उभारणी साठी प्रयत्न केल्याबद्दल मा.विजयराज डोंगरे, सौ.शैला गोडसे मॅडम यांचे अभिनंदन केले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads