महाराष्ट्र
आ. विजयकुमार देशमुख यांची कोरवली ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (कामती) : दि.४/१०/२१ सोमवारी आमदार विजयकुमार देशमुख मौजे अरबळी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी जात असताना कोरवली ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.याभेटीचे औचित्य साधून कोरवली ग्रामपंचायत कडून आमदार विजयकुमार देशमुख व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचा यथोचित सत्कार केला.अत्यंत कमी वेळात या सत्काराचे नियोजन कोरवली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व युवकांनी केले.सत्काराला उत्तर देताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी गावातील सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घ्या,त्यांची कामे करा.वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामांना प्राधान्य देण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
मा.विजयराज डोंगरे यावेळी बोलताना म्हणाले कि, आत्तापर्यंत कोरवली गावाला सव्वा कोटी रूपये निधी दिला आहे.येत्या महिन्यात ५० ते ६० लाख रूपये निधी देऊ. कोरवली ग्रामपंचायत मध्ये प्रथमच आल्याने भारावून गेल्याचे सांगितले.
मा.शिवानंद अण्णांनी यावेळी म्हणाले की, तुम्ही काम करा मी निधी उपलब्ध करून देतो असे अण्णांनी सांगितले.याप्रसंगी शंकरराव वाघमारे , जयसिंग नाना आवताडे,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक,युवक अंगणवाडी सेविका, शिक्षीका, कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुरेश म्हमाणे व आभारप्रदर्शन सिध्दाराम म्हमाणे यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment