नवरात्रौत्सवात कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक :- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश जारी - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

नवरात्रौत्सवात कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक :- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश जारी



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर,दि.6: यावर्षी 7 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र/दुर्गापुजा/दसरा सण साजरा करण्यात येणार आहे, मात्र जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजुनही कायम आहे. नागरिकांनी या सणांमध्ये गर्दी करु नये. नवरात्रौत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषयक खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.

 श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) हे आदेश जारी केले आहे. त्यांनी आदेशात म्हटले आहे की, नवरात्रौत्सवासाठी मंडळानी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार असुन त्यापध्दतीने मुर्तीची सजावट करावी. मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट तर घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूट असावी. शक्यतो मागील वर्षी प्रमाणे देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर मुर्तीचे पुजन करावे. मुर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे. घरी शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यासदर्भांत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. माझे कुंटूब माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक शिबीरे, रक्तदान शिबीरे यांना प्राधान्य द्यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक इ.द्वारे जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

आरती, भजन, कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढु नयेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विसर्जन स्थळी जाणे टाळावे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी  स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मुर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. रावण दहणाचा कार्यक्रमासाठी कमीत कमी व्यक्ती उपस्थित राहतील याची व्यवस्था करावी.

आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कारवाई करण्यात येईल, तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads