मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील शुभम ज्वेलर्स दरोड्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने कामती पोलीसांनी केले फिर्यादीच्या स्वाधीन.. कामती पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांची माहिती.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील शुभम ज्वेलर्स दरोड्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने कामती पोलीसांनी केले फिर्यादीच्या स्वाधीन.. कामती पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांची माहिती..




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (कामती) : दिनांक 7/4/2021 रोजी मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील  शुभम ज्वेलर्स  वर या सराफ दुकानावर धाडसी दरोडा पडला होता.
या वेळेस भिमाशंकर सुधाकर पोतदार मुळचे रा.डोणज ता . मंगळवेढा व सध्या सराफ व्यावसाय मुळे मु.पो.वाघोली ता मोहोळ जिल्हा सोलापूर येथे भाड्याने राहत असे  शुभम ज्वेलर्स या दुकानातून अदन्यात चोरट्यांनी वरील तारखेस
मोठ्या प्रमाणात सोन्याची चोरी केली होती.
सदर गुन्ह्यातील आरोपीस कामती पोलीस ठाण्याच्या पथकाने सिताफीने अटक करून आरोपींच्या ताब्यातील सोने जप्त केले होते.
सदर सोन्याची ही कायदेशीर कारवाई करुन झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पालन करून सोने सोडवून घ्यावे लागत असुन वाघोली गावातील प्रतिष्ठित नागरिक राजु कोरे व समाजसेवक नेताजी भैय्या वाघमारे यांनी एडवोकेट किरण सराटे यांच्याशी संपर्क साधुन सोने सोडवून देण्यासाठी विनंती केली.व एडवोकेट किरण सराटे यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास करून सोने सोडवून दिले व सोने सोडवून घेत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्याची माहिती एडवोकेट किरण सराटे यांनी बुधवारी पत्रकारा शी बोलताना दिली.
तसेच कामती पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी ही अधिक माहिती पत्रकारा शी बोलताना दिली.
ते म्हणाले की मा. पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली किंमती मुद्देमालाचे निर्विची मोहीम सुरू आहे.
कामती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 77/2021 या गुन्हा मध्ये 1 आरोपीस अटक करून त्याच्या कडून 7 तोळे 8 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. त्यानंतर सदर गुन्ह्यातील फिर्यादिस संपर्क साधुन मा. न्यायालयाचा आदेश प्राप्त करून घेऊन आज रोजी मा. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्याने सदर फिर्यादीस पोलीस स्टेशन ला बोलावून फिर्यादिस मुद्देमाल गावातील ग्रामस्थ मंडळी समक्ष देण्यात आले.हा मुद्देमाल प्राप्त करून दिल्याबद्दल वाघोली येथील शुभम ज्वेलर्स चे मालक भिमाशंकर सुधाकर पोतदार व वाघोली येथील ग्रामस्थ मंडळी यांच्या कडून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळेस शुभम ज्वेलर्स चे मालक भिमाशंकर सुधाकर पोतदार यांच्यासह माजी सरपंच व उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे,एडवोकेट किरण सराटे,नेताजी भैय्या वाघमारे, राजकुमार कोरे,माजी सरपंच मुकुंद पाटील,अशोक मसरे,
तानाजी पाटील,उमेश पाटील, सिध्देश्वर पवार,नंदकुमार  गेनाप्पा पाटील.यांच्यासह कामती पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads