महाराष्ट्र
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने द. सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेस आजपासुन सुरवात...
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंदूप) : बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा हा उपक्रम सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील लक्ष्मी मंगलकार्यलयात मंद्रूप पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुपारी 2 च्या दरम्याने पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंद्रूप पोलीस स्टेशन साहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे व येळेगाव सरपंच संजीवकुमार लोणारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्ते डी.के गोरडे सर हे लाभले होते.
यावेळेस कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डी.के गोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच बरोबर मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्यासह येळेगावचे विद्यमान सरपंच संजीव कुमार लोणारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक सातपूते मॅडम यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा पोलीस ग्रामीण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्या करिता आज मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व पत्रकार व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रत्यक्षित आयोजित करण्यात आले होते ग्राम सुरक्षा यंत्रणेचे डि.के. गोरडे यांनी उपस्थितिना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले सर्व सरपंच , नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
गेल्या नऊ वर्षात पुणे नाशिक सातारा अहमदनगर जिल्ह्यातील 3500 होऊन हे अधिक गावे ग्रामीण पोलीस स्टेशन व ग्राम सुरक्षा योजनेत सहभागी झाले आहेत
ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरताहेत संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर नोंद केलेल्या नागरिकांना आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना ऐकू येतो घटना घडत असतानाच माहिती मिळाल्याने तातडीने मदत व सहकार्य करणे शक्य होते
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डी.के गोरडे सर यांच्यासह मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे,मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे,मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद,विद्यमान जिल्हा परिषद सदस्या विदुलता कोरे, येळेगावचे सरपंच संजीवकुमार लोणारी,मंद्रूप गावच्या सरपंच कलावती खंदारे,विस्तार अधिकारी पाटील बी.सी., A.S.I. सलबत्ते,A.S.I.कांबळे,हेड काॅस्टेबल आसादे,पोलिस हवालदार प्रदीप बनसोडे,पोलीस हवालदार कृष्णा पवार,पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल महिंद्रकर,पोलीस नाईक बुरजे,पोलीस नाईक शंकर पाटील,पोलीस शिपाई महेश कोळी,भंडारकवठे बीटचे पोलीस नाईक अबुताहेर शेख यांच्यासह मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment