महाराष्ट्र
अकोले मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याचे जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रूप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेल विद्यार्थी आर्यन किशोर पाटील याचा जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.या विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याला जिल्हा परिषद शाळा व गावकर्यांकडून त्याला बुधवारी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक कोरे,वर्गशिक्षक प्रमोद माने,सहशिक्षक प्रमोद बब्रुवान माने, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सुप्रिया देशमुख,घाडगे, गब्बूरे, राठोड,सलवदे यांच्यासह अकोले मंद्रूपच्या ग्रामसेविक बंदपट्टे,कंदलगावचे प्रगतशील बागायतदार दादा जाधव, मिलन माने,सागर कोळी अमोल माने,तसेच नेताजी पाटील, बाळासाहेब माने,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य धोंडोपंत बापू पाटील,रावसाहेब पवार,सागर जाधव, बाळकृष्ण सुरवसे अण्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment