स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर शेतकरी,कामगार ,तोडणी वाहतूकदार यांच्या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन.. - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर शेतकरी,कामगार ,तोडणी वाहतूकदार यांच्या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन..



सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:-दि 20/09 रोजी मा खा  राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्याचे  मागील गाळप हंगामातील FRP, कामगारांचे पगार , तोडणी वाहतूकदारांचे पैसे व चालू गाळप हंगामातील उसाच्या एफ आर पी चे तीन टप्प्यातील तुकडे या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
  यावेळी बोलताना राहुल घुले म्हणाले की जिल्ह्यातील  कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या एफ आर पी पैसे अद्याप पूर्ण मिळालेले नाही त्यात शासनाने चालू गाळप हंगामात एफ आर पी चे तीन तुकड्यात वाटप हे सर्व शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ चालू आहे  कारखानदारांनी शेतकर्याचे अंत पाहू नये अन्यथा जिल्ह्यातील एका ही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही
   यावेळी स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले ,पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे-पाटील, जिल्हा संघटक युवराज घुले, भारत पवार,श्रीधर खांडेकर, सिद्धेश्वर हेंबाडे, दत्तात्रय गण पाटील,सचिन आटकळे, नानासाहेब चव्हाण, श्रीमंत केदार,रोहित भोसले, आबा खांडेकर,   दामोदर देशमुख,  नितीन नकाते ,विजयकुमार खवतोडे,
अनिल बिराजदार, ओगेप्पा सोनगे,अनिल अंजुटगी, विजयकुमार भरमगोंडे, रेवणसिद्ध नांगरे, श्रीकांत पाटील,ज्ञानेश्वर भगरे, सिद्धेश्वर डोके, चंद्रकांत घुले,आकाश भोसले,अर्जुन मुद्गुल, प्रभूचंद्र शिंदे, व अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads