महाराष्ट्र
नूतनीकरणानंतर प्रियदर्शनी सांस्कृतिक भावनांचे नगराध्यक्षा शोभाताई खेडगी हस्ते लोकार्पण :- 1 ऑक्टोबर पासून लोकांच्या सेवेत
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
अक्कलकोट - अक्कलकोट शहर तालुक्यातील जनतेसाठी हक्काचे आणि जिव्हाळ्याचे समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शनी मंगल कार्यालयाचे नूतनीकरण काम पूर्ण झाले असून नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांच्या हस्ते फित कापून या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या, हे कार्यालय पूर्ववत सुरु व्हावे ही अक्कलकोटकरांची आग्रही मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही जिल्हा नगरोथान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या 90 लाख निधीतून ही इमारत सुसज्ज बनवली आहे. कांही तांत्रिक अडचणी उदभवल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण न झाल्याची खंत असली तरी ते पूर्ण होऊन जनतेसाठी खुले झाले याचे समाधान आहे. सेवेला विलंब झाल्याबद्दल आम्ही अक्कलकोटकरांची दिलगिरी व्यक्त करतो
अंतर्गत आणि बाहेरील बाजूने ही इमारत नीटनेटकी करून अद्ययावत लाईट फिटिंगसह सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे गोरगरीब जनतेला कमी खर्चात आपल्या मुलामुलींचे विवाह सोहळे अथवा अन्य कौटुंबिक कार्यक्रम आनंदाने साजरे करता येतील.
यावेळी नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, पक्षनेता महेश हिंडोळे, विरोधी पक्षनेते अशपाक बाळोरगी, नगरसेवक सद्दाम शेरकर, विकास मोरे, चंदन अडवितोटे, अशोक हरकूड जितेश यारोळे, विक्रम हर्डीकर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment